March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

मुंबई महापालिका निवडणूक 2026: निकालासाठी वाढणार प्रतीक्षा, मतमोजणीचा नवा फॉर्म्युला…

BMC Election 2026 मध्ये मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांची मतमोजणी टप्प्याटप्प्याने होणार असून त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई |

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले असून, सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. BMC Election 2026 च्या निकालासाठी नागरिकांना यंदा थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते.

१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असले तरी, यंदा मतमोजणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे सर्व २२७ वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार नाही.

🔹 एकावेळी फक्त दोन वॉर्डांची मतमोजणी

मुंबई शहरासाठी एकूण २३ मतमोजणी अधिकारी नेमण्यात आले असून, प्रत्येक अधिकाऱ्याकडे साधारण दहा वॉर्डांची जबाबदारी असेल. मात्र, एका मतमोजणी केंद्रावर एकावेळी केवळ दोनच वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एका टप्प्यात जास्तीत जास्त ४६ वॉर्डांचेच निकाल समोर येतील.

पाच टप्प्यांत पूर्ण होणार मतमोजणी

२२७ वॉर्डांची मतमोजणी पाच टप्प्यांत पार पडणार असून, त्यामुळे काही प्रभागांचे निकाल सकाळी जाहीर होतील, तर उर्वरित निकाल दुपारनंतर किंवा सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचा यामागचा उद्देश काय?

प्रशासनाच्या माहितीनुसार, टप्प्याटप्प्याने मतमोजणी केल्यास उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करता येईल आणि प्रक्रिया अधिक सुरळीत व नियंत्रित राहील. मात्र, या निर्णयामुळे सुरुवातीच्या टप्प्यात संपूर्ण मुंबईतील राजकीय कल (trends) स्पष्ट होणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यभरात एकाचवेळी महापालिका निवडणुका

विशेष म्हणजे, राज्यात एकाचवेळी २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील महापालिकांचा यात समावेश आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.

Spread the love