
पुणे (प्रतिनिधी : अमित मुंडिक): गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कोथरूड पोलिसांनी सराईत आरोपी रोहिदास उर्फ तेजस राजेंद्र कांबळे (वय २५) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याला छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
या स्थानबद्धतेचे आदेश १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आले होते. त्यानुसार, १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२० वाजता कोथरूड पोलिसांच्या देखरेख व तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याला स्थानबद्धतेच्या आदेशाची प्रत देण्यात आली. त्यानंतर आवश्यक पोलीस बंदोबस्तात त्याची छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही कारवाई केली.

More Stories
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…