October 26, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणी काळभोरच्या सह्याद्री स्पोर्ट्सच्या खेळाडूंची वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी…

लोणी काळभोर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या विद्यमाने तसेच हरिभाई देसाई कॉलेज, पुणे यांच्या सौजन्याने ७ व ८ ऑक्टोबर रोजी आयोजित विभागस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत सेंटरच्या आठ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये नेत्रा भागवत थोरात हिने १७ वर्षांखालील ४४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. आर्या अण्णाराव गायकवाड हिने १७ वर्षांखालील ६३ किलो वजनी गटात, तर सार्थक नामदेव इंदलकर याने १९ वर्षांखालील ६० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, नेत्रा थोरात हिला १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ‘बेस्ट वेटलिफ्टर’ हा किताब मिळाला.

याशिवाय कार्तिकी प्रदीप शेडगे हिने १७ वर्षांखालील ४४ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, आराध्या संदीप भोसले हिने ५३ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक, कृष्णा सागर पेटारे याने ६५ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, तर ऋषिकेश हनुमंत सहाने याने ५६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला.

या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक आणि राष्ट्रीय वेटलिफ्टिंग पंच गणेश विठ्ठल नगीने यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल लोणी काळभोरमधील ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसंचालक तुषार नामदेव दौंडकर, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर, कार्यकारी सचिव प्रशांत बेंद्रे, महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके, वि.वि.का. सोसायटीचे चेअरमन रमेश यशवंत भोसले, हवेली तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश ज्ञानेश्वर उबाळे, उपाध्यक्ष अमर गणपत गिरी, खजिनदार नरेश गणपत गिरी, भाजप नेते कमलेश दत्तात्रय काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर काळभोर व आप्पासाहेब काळभोर आणि क्रीडाशिक्षक राजू गुलाबराव काळभोर यांनी अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Spread the love