
नागपूर : शक्तीच्या उपासनेचा पवित्र उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नागपूरसह संपूर्ण विदर्भात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच विविध देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, घरोघरी आणि मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करून देवी दुर्गेचे पूजन केले जात आहे.
पहाटेच्या आरतीने, मंत्रोच्चारांनी आणि देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये दाखल होत आहेत. यावेळी भाविकांकडून कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
नवरात्रीच्या पुढील नऊ दिवसांत देवीची विविध रूपांत पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

More Stories
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…