
पिंपरी :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढलेला दिसत आहे. अर्ज वितरणाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी ६१६ इच्छुक उमेदवारांनी एकूण १,४३३ नामनिर्देशन अर्ज घेतले.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशन अर्ज वितरण व स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ८७५ इच्छुक उमेदवारांनी तब्बल २,२१२ अर्ज घेतले होते. मात्र त्या दिवशी एकाही उमेदवाराने प्रत्यक्ष अर्ज दाखल केला नव्हता.
दोन दिवसांत एकूण १,४९१ इच्छुक उमेदवारांनी ३,६४५ उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १७-ड मधून माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाचे नेते सचिन बाजीराव चिंचवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रभागातून दाखल झालेला हा एकमेव अर्ज आहे.
दरम्यान, आज गुरुवार (दि. २५ डिसेंबर २०२५) रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकृती प्रक्रिया बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…