
लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीसांनी सराईत आणि धोकादायक गुन्हेगाराविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिबंधाबाबतच्या कायद्यान्वये (MPDA) कारवाई केली आहे. राज रविंद्र पवार (वय २८, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, हवेली, पुणे) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अमरावती कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राज पवार याच्यावर लोणी काळभोर आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याने त्याच्यावर यापूर्वी ३ सप्टेंबर २०२४ रोजी MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा परिसरात आल्यानंतर पवार याच्यावर खुनाचा प्रयत्न, धोकादायक शस्त्राने दुखापत करणे, गंभीर धमकी, मृत्यूची भीती दाखवून खंडणी मागणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलिसांनी पुन्हा MPDA कायद्यान्वये कारवाई केली. या कारवाईनंतर त्याला एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी केली.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…