September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई: फटाका बुलेट अन् रस्त्यावर वाढदि वस साजरा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल…

पुणे: शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर मोठ्या आवाजात फटाका बुलेट चालवणाऱ्यांवर आणि सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या युवकांवर कोंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

​मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरात शांतता राखण्यासाठी तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष गस्त आयोजित केली होती.

​फटाका बुलेटवर सायलेन्सर जप्तीची कारवाई

​गस्तीदरम्यान काही युवक फटाका बुलेटच्या माध्यमातून मोठ्या आवाजात फटाक्यांसारखा आवाज काढून वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस अंमलदार सुरज शुक्ला व संतोष बनसुडे यांनी तातडीने कारवाई करत संबंधित वाहनांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून दोन्ही वाहनांवरील कर्णकर्कश सायलेन्सर काढून घेण्यात आले असून वाहनचालकांवर नियमानुसार कायदेशीर खटले दाखल करण्यात आले आहेत.

​रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या ४ जणांवर गुन्हा दाखल

​काही युवकांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती आला होता. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत कोंढवा पोलिसांच्या पथकाने संबंधित चार युवकांना ताब्यात घेतले.

​त्यांच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ६६२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२५, १२६ (२), २८५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांचे नागरिकांना आवाहन

​”कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फटाका बुलेट चालवणे किंवा सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करून शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. असा कोणताही प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्याशी संपर्क साधावा.”

​— कोंढवा पोलीस ठाणे

​कारवाई करणारे पोलीस पथक

​सदरची कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, सागर पवार, सहाय्यक पोलीस फौजदार शरद वाकसे यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल हिरवे, रविंद्र विप्पा, विशाल मेमाणे, स्वागत पळसे, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, अमित सुर्यवंशी, केशव हिरवे, प्रशांत खाडे, रियाज पटेल, पुष्पेंद्र चव्हाण, राहुल रासगे, राहुल शेलार, रशिद शेख, शाहिद रजपुत, ओमकार शेटे व रवि जाधव यांनी सहभाग घेतला.

Spread the love

You may have missed