October 28, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणी काळभोरमध्ये ‘खेत बचाव अभियान’; शेतकऱ्यांना संतुलित खत वापर आणि नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन…

oplus_136314880

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील मौजे लोणी काळभोर येथे २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘खेत बचाव अभियानांतर्गत’ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संतुलित खतांचा वापर, मृद आरोग्य तपासणी, नैसर्गिक शेती, हिरवळीच्या पिकांचा वापर, मुरघास निर्मिती तसेच महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी याबाबत माहिती देण्यात आली.

मा. प्रकल्प संचालक, आत्मा पुणे श्री. सुरज मडके आणि तालुका कृषी अधिकारी श्री. अमित रणवरे यांच्या सूचनेनुसार, तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री. गणेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. रतन जाधव, एबीएस इंडिया कंपनीचे विक्री व्यवस्थापक श्री. निलेश लगड आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गावडे मॅडम यांनी मुरघास तंत्रज्ञानासह शेतीविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन केले.

यावेळी उपकृषी अधिकारी श्री. वाळुंजकर आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती रेश्मा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. वीरपाटील यांनी केले.

या उपक्रमातून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य जपणे, खतांचा योग्य वापर करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि पशुधनासाठी मुरघास निर्मितीचे तंत्रज्ञान समजून घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

oplus_2097152

Spread the love