September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणीकाळभोरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; १.३३ लाखांचा प्रतिबंधित पान मसाला व तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल…

पुणे (लोणी काळभोर): पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एका प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखू विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे. शासनाने बंदी घातलेला १ लाख ३३ हजार १०० रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एका ३३ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कार कारवाईची सविस्तर माहिती

  • घटनेची वेळ व दिनांक: ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १८:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
  • घटनास्थळ: गायकवाड कॉम्प्लेक्स, लेन नंबर १, घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
  • आरोपीची माहिती: रुपेश आत्माराम गायकवाड (वय ३३ वर्षे, रा. गायकवाड कॉम्प्लेक्स, लेन नंबर १, घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
  • जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: आरोपीच्या घरातून शासनाने प्रतिबंधित केलेला एकूण १,३३,१००/- रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि पान मसाल्यासाठी लागणारी तंबाखू/जर्दा जप्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास

​लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अशोक भागवत गिरी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने आपल्या घरात विक्रीच्या उद्देशाने हा प्रतिबंधित माल साठवून ठेवल्याचे उघडकीस आले.

​या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) कलम २२३, २४४, २५५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम ३०(२)(अ), ३१(१), २६(२)(I), २६(2)(IV) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) बोराटे करत आहेत.

Spread the love

You may have missed