
कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ६ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा विद्यमान सदस्य राजश्रीताई काळभोर आणि उदय भाऊ काळभोर यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमात नागरिकांसाठी NCMC कार्ड नोंदणी व वाटप करण्यात आले. नोंदणी केलेल्या तब्बल १ हजार ५०० नागरिकांना NCMC कार्डचे वाटप करण्यात आले.
याशिवाय विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच गॅलेक्सी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले. या विविध आरोग्य उपक्रमांचा सुमारे ३ हजार नागरिकांनी लाभ घेतला, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना आरोग्यसेवा आणि शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला चित्तरंजन नाना गायकवाड, प्रशांत दादा काळभोर, नासिर खान पठाण, अनिल टिळेकर, अविनाश पप्पू बडदे, अभिजित पप्पू बडदे, बिना काळभोर, सिमिता लोंढे, सुरेश काळभोर, निलेश काळभोर, सतिष काळभोर, नितीन लोखंडे, शिवाजी काळभोर, जयप्रकाश कदम, समीर खान, रमजान तांबोळी, दीपक काळभोर, राणीताई बडदे, ॲड. राहुल झेंडे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


More Stories
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…
कोथरूड पोलिसांची कारवाई; सराईत आरोपी रोहिदास कांबळे एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध…