महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयात होणार आहे. नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महत्त्वाचा टप्पा समोर आला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी काढण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती नगरविकास विभागाने दिली आहे.
15 जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर 16 जानेवारीला मतमोजणी झाली. त्यानंतर आता महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात ही आरक्षण सोडत पार पडणार आहे.
या सोडतीनंतर राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत कोणत्या वर्गाचा महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढली जाणार आहे.
📄 नगरविकास विभागाच्या पत्रात काय नमूद?
नगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार,
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मंत्रालय, मुंबई येथे 6व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजता सुरू होणार असल्याचे पत्रात नमूद आहे.

आरक्षण पद्धतीत बदल होणार?
महापौरपदाच्या आरक्षण प्रक्रियेत चक्राकार (Rotation) पद्धतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि ओबीसी प्रवर्गांसाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू आहे.
मात्र, नव्या चर्चांनुसार ही प्रक्रिया पुन्हा ओपन कॅटेगरीपासून सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यामुळे काही महानगरपालिकांमधील आरक्षणाचे गणित बदलू शकते.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची आघाडी
महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने आपली ताकद दाखवली आहे. मुंबईसह राज्यातील 19 महानगरपालिकांमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली असून, नागपूरमध्ये पक्षाचा गड कायम आहे. संभाजीनगरमध्येही भाजपने सत्ता मिळवत राजकीय समीकरणे बदलली आहेत.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल