
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे लोणी काळभोर येथील भक्ती शक्ती चौकातही शिवजयंती मोठ्या जल्लोषात पार पडली.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “जय शिवाजी, जय भवानी” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. उपस्थितांनी मानवंदना देत शिवजयंतीचा उत्सव भक्तीभावाने साजरा केला.
मल्हारी तात्या कोळपे (माजी पंचायत समिती सदस्य) यांच्या पुढाकाराने हा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी शंकर जैनजांगडे, सोमनाथ लांडगे, जयराम केसकर, संजय विरकर, विजय महानवर, चीमाजी केसकर, दत्ता केसकर, सुधीर काळभोर, दत्तात्रेय चोरमले, नवनाथ गायकवाड, भानुदास शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…