
पुणे : शहरातील सार्वजनिक बसप्रवासात चोरीच्या घटना वाढत असल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. PMPML बसमधील गर्दीचा फायदा घेत एका महिलेला तब्बल ६.९० लाख रुपयांच्या दागिन्यांचा फटका बसला आहे.
३० मार्च रोजी हडपसर ते चिंचवड मार्गावर ही घटना घडली. तक्रारदार महिला उमरगा येथील असून त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. हडपसर गाडीतळावरून बसमध्ये चढल्यानंतर वैदुवाडी परिसरात बस पोहोचताच त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका अनोळखी महिलेने अचानक उलटी येत असल्याचा बहाणा केला. या प्रकारामुळे तक्रारदारांचे लक्ष दुसरीकडे वळले.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट लंपास केले. बसमधून उतरल्यावर हा प्रकार उघडकीस आला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या प्रकरणी Wanawadi Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरातील बसमध्ये वाढती गर्दी, घाईगडबड आणि गोंधळ यामुळे अशा गुन्ह्यांना खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

More Stories
नसरापूर प्रकरणानंतर पुण्यातील पर्वती भागात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न…
नसरापूरमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर खून; आरोपी ताब्यात, संतप्त ग्रामस्थांचा पुणे–सातारा महामार्गावर रास्ता रोको
लाणी काळभोरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी…