
लाणी काळभोर : सिद्राम मळा परिसरातील नांदेपाटील वस्तीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य मल्हारी कोळपे, विद्यमान पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, अॅड. बाळासाहेब दाभाडे तसेच ‘सुदर्शन न्यूज’चे पत्रकार अक्षय दोमाले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी सुनित जैनजंगडे यांनी सूत्रसंचालन करत त्रिशरण पंचशीलचे पठण केले. महापुरुषांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तसेच मोठ्या प्रमाणात आतीषबाजी करण्यात आली. तरुणांनी डीजेच्या तालावर उत्साह व्यक्त केला.
महाराज ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकर जैनजांगडे, शंकर धायगुडे, राहुल बनसोडे, अक्षय मस्तूद, संतोष माळी, चंद्रकांत जैनजांगडे , नागेश वाघमारे, सोमनाथ लांडगे, दुर्गेश धायगुडे, मोहिते जैनजांगडे, विश्वजीत जैनजांगडे, नवनाथ आढळे यांसह अनेक कार्यकर्त्यांसह महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…