June 9, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात ‘Hoolive Grace’ लेडीज PG मध्ये विद्यार्थिनींचा छळ; मनसेच्या गौरव खेडेकरांनी जाब विचारताच वॉर्डनची अश्लील भाषेत शिवीगाळ…

पुणे: पुण्यातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आंबेगाव पठार परिसरातील ‘Hoolive Grace’ या नामांकित लेडीज पीजी (Hostel/PG) मध्ये राहणाऱ्या मुलींना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिथे राहणाऱ्या महिलांना टार्गेट करून त्यांचे रॅगिंग (Ragging) आणि मानसिक छळ (Torture) केला जात असल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने केली होती. या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते गौरव खेडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हॉस्टेल प्रशासनाला जाब विचारला असता, हॉस्टेलच्या वॉर्डन सर्व मर्यादा ओलांडत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणात मनसेने मध्यस्थी करत संबंधित हॉस्टेलच्या वॉर्डनला चांगलाच धडा शिकवला आहे.

नेमकी घटना काय?

‘Hoolive Grace’ लेडीज पीजीमध्ये काही महिला आणि विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. हॉस्टेल प्रशासनाकडून त्यांना जाणूनबुजून टार्गेट केले जात होते, तसेच चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन त्यांचे रॅगिंग केले जात होते. या त्रासाला कंटाळून एका पीडित मुलीने मनसेचे गौरव खेडेकर यांच्याकडे धाव घेतली आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

महिलांच्या सुरक्षेचा आणि अस्मितेचा प्रश्न असल्याने गौरव खेडेकर यांनी तात्काळ ‘Hoolive Grace’ हॉस्टेल गाठले आणि तिथल्या व्यवस्थापनाला या प्रकाराबाबत जाब विचारला.

वॉर्डनची अरेरावी आणि अश्लील वक्तव्य

मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारताच तिथली महिला वॉर्डन (Warden) प्रचंड भडकली. आपली चूक सुधारण्याऐवजी तिने उलट तक्रार करणाऱ्या पीडित मुलीलाच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. *”ती रांड आहे, बाहेरून पैसा कमवून आणणाऱ्या अशा पोरींना आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये ठेवणार नाही,” असे म्हणत अत्यंत अश्लील आणि अक्षेपार्ह शब्दांत शिवीगाळ केली. महिला असूनही दुसऱ्या महिलेचा असा जाहीर अपमान केल्याने तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हॉस्टेल प्रशासनाचा हा उद्धटपणा आणि तरुणीचा झालेला अपमान पाहून मनसेचे गौरव खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महिलांचा सन्मान राखण्यासाठी हा विषय ‘मनसे स्टाईल’ने हाताळण्यात आला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी हॉस्टेल प्रशासनाला आणि उद्धट वॉर्डनला त्यांच्याच भाषेत कडक शब्दांत समज दिली. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही वेळातच वॉर्डनची बोलती बंद झाली. अखेर चूक मान्य करत हॉस्टेल प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आणि हा वाद तात्काळ मिटवण्यात आला.

तरुणी सुरक्षीत; मनसेचा इशारा


मनसेच्या या दणक्यानंतर पीडित तरुणीला न्याय मिळाला असून, हॉस्टेलमधील इतर मुलींनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. “शहरात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसोबत आणि आदरासोबत खेळ खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात कोणत्याही हॉस्टेलमध्ये महिलांचा असा छळ झाला, तर मनसे याहून तीव्र भाषेत उत्तर देईल,” असा इशारा यावेळी मनसेचे गौरव खेडेकर यांच्याडून देण्यात आला.

Spread the love