
पुणे : वेटलिफ्टिंग संघटना पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी हरीभाई देसाई कॉलेज, पुणे येथे या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत १२, १४ आणि १७ वर्षांखालील वयोगटांमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण १३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या १८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यापैकी आठ खेळाडूंची सांगली येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुवर्णपदक विजेते खेळाडू :
- मंजिरी अमित बोळे – १२ वर्षांखालील, ३२ किलो वजन गट
- जान्हवी सुहास पाटील – १२ वर्षांखालील, ३६ किलो वजन गट
- त्रिशा सुधीर काळभोर – १४ वर्षांखालील, ३६ किलो वजन गट
- रिजा आसिफ शेख – १४ व १७ वर्षांखालील, ४९ किलो वजन गट
- साईराज दीपक भुजबळ – १४ वर्षांखालील, ६५ किलो वजन गट
- नेत्रा भागवत थोरात – १७ वर्षांखालील, ४५ किलो वजन गट
- आर्या अण्णाराव गायकवाड – १७ वर्षांखालील, ६५ किलो वजन गट
- सार्थक ज्ञानदेव इंदलकर – १७ वर्षांखालील, ६५ किलो वजन गट
रौप्यपदक विजेते खेळाडू :
- ओवी अमर गिरी – १२ वर्षांखालील, ३२ किलो वजन गट
- सिद्धी संतोष गावडे – १४ वर्षांखालील, ६१ किलोपेक्षा अधिक वजन गट
- नंदिनी जालिंदर काळभोर – १४ वर्षांखालील, ६१ किलो वजन गट
- तन्वी गणेश अंबिके – १७ वर्षांखालील, ४५ किलो वजन गट
- कृष्णा सागर पेटारे – १७ वर्षांखालील, ७० किलो वजन गट
कांस्यपदक विजेते खेळाडू :
- आरोही विपुल पवार – १२ वर्षांखालील, ४९ किलो वजन गट
- आराध्या संदीप भोसले – १४ वर्षांखालील, ५३ किलो वजन गट
- ऋषिकेश हनुमंत सहाने – १७ वर्षांखालील, ५५ किलो वजन गट
तर कार्तिकी प्रदीप शेडगे आणि अरमान दगडूशेठ यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या सर्व खेळाडूंना श्री. गणेश विठ्ठल नगीने, श्री. अमर गणपत गिरी आणि कु. नरेश गणपत गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर, सचिव प्रशांत बेंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसंचालक श्री. तुषार नामदेव दौंडकर, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके, वि. वि. का. सोसायटी लोणी काळभोरचे चेअरमन रमेश यशवंत भोसले, वेटलिफ्टिंग संघटना हवेली तालुका अध्यक्ष योगेश ज्ञानेश्वर उबाळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बाबुराव भोसले, सुधीर काळभोर, तुषार कुंभार आणि मयूर चांदणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

More Stories
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी समाधान पवार; प्रदीप पवारांसह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा…
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना मिळणार व्यासपीठ; सूर्यदत्तमध्ये उद्या ‘कारोबार ९.०’ स्टार्टअप फेस्ट…