September 14, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

नारायण राणेचा राजकीय संन्यास? सांगितले, “मुलांना सांगेन, आता घरी बसायचं”

सिंधुदुर्गातील सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यांनी भावनिक आवाहन करत सांगितले, “मुलांना सांगेन, विकासात्मक काम त्यांनी करतील, मी आता घरी बसणार.”

सिंधुदुर्ग:

राज्याच्या राजकारणात एक मोठी घटना घडत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सिंधुदुर्गमध्ये आयोजित जाहीर सत्काराच्या वेळी राणेंनी स्पष्टपणे सांगितले, “आता घरी बसायचं ठरवलंय. दोन्ही मुलांना सांगेन, नांदा सोख्यभरे.”

त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत म्हटले, “माझ्यानंतर विकासात्मक काम निलेश आणि नितेश करतील. पक्ष सांभाळा, स्वार्थासाठी राजकारण करू नका. त्यांनी हाक दिल्यास ओ द्या.”

नारायण राणे म्हणाले, “वय वाढल्याने शरीर थकतंय. राजकारणात कटकारस्थान होत आहे, त्यामुळे मी ठरवलंय आता घर बसायचं. माझ्या मुलांनी राजकारणात चांगले काम करत आहेत. योग्य लोकांना संधी द्या आणि सेवेत जोपासा.”

सभेत राणेंनी आपल्या अनुभवांचीही आठवण करून दिली. “आजही मी रस्त्यावर भाजी घेतो. काही लोक काळ्या काचेच्या गाड्यांमध्ये येतात, पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. अनेकांनी माझ्या आड काम केलं, पण मी त्यावर बोलणार नाही. द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, राणेंनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले, “एक व्हा, मला कोणाची भीती नाही. पैशासाठी राजकारण करू नका. माझ्यानंतर विकासात्मक काम माझ्या मुलांनी करणार आहे. त्यांनी हाक दिली तर ओ द्या.”

नारायण राणे यांनी स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमामुळे त्यांना अनेक निवडणुका जिंकता आल्या, परंतु राजकारणातील कटकारस्थान पाहून आता निवृत्तीची वेळ आली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले की, “पक्ष सांभाळा, स्वार्थ नको. माझ्या आधी किंवा नंतर एखाद्या नेत्याने माझ्यासारखं काम केलेलं दाखवा.”

Spread the love

You may have missed