थेऊर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Theur | Loni Kalbhor Crime News:
पुणे जिल्ह्यातील थेऊर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बारावीच्या वर्गात शिकत असून लोणी काळभोर परिसरातील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. तिच्या आईने (वय 34) दिलेल्या तक्रारीवरून वैभव संजय शिरवाळे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवरून अल्पवयीन मुलीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने स्पष्ट नकार देत पुन्हा संदेश पाठवू नये, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग सुरू ठेवला.
शनिवारी सकाळी मुलगी नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी जात असताना थेऊर परिसरातील एका मंदिराजवळ आरोपी थांबलेला होता. त्याने मुलीकडे संशयास्पदपणे पाहत तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…