March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

BMC Election 2026: मुंबईत बससेवेला ब्रेक! 1,000 हून अधिक BEST बस निवडणूक ड्युटीवर; प्रवाशांची मोठी गैरसोय….

BMC Election 2026 मुळे मुंबईतील BEST बससेवेवर मोठा परिणाम होणार आहे. 1,000 हून अधिक बस निवडणूक ड्युटीवर असल्याने 13 ते 16 जानेवारीदरम्यान प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता.

मुंबई |

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहने ताब्यात घेण्यात येत आहेत. शहर आणि उपनगरांमध्ये धावणाऱ्या BEST उपक्रमाच्या तब्बल 1,023 बस निवडणूक सेवेसाठी वापरण्यात येणार असल्याने मुंबईतील नियमित प्रवासी बससेवेवर याचा थेट परिणाम होणार आहे.

निवडणूक केंद्रांवर ईव्हीएम मशीन, मतदान साहित्य तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी या बसचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित प्रभागांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत या बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीच्या रात्रीपासून 15 जानेवारीच्या रात्रीपर्यंत या बस निवडणूक कामात कार्यरत राहणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व बस तातडीने BEST उपक्रमाकडे परत सुपूर्द केल्या जातील.

BEST प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक सेवेसाठी देण्यात आलेल्या बससाठीचे भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जात असून, या बससोबत BEST चेच प्रशिक्षित चालक असतील.

दरम्यान, निवडणूक सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर बस तैनात केल्यामुळे दैनंदिन प्रवासी, खासगी कार्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या काळात बससेवेची संख्या कमी राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

निवडणूक सेवेत असलेल्या बसेसचा तपशील

  • खासगी बसेस: 1,160 (35 आसनी)
  • BEST बसेस: 1,023
    • मिडी बसेस: 440
  • एसटी बसेस: 101 (40 ते 50 आसनी)

Spread the love