
बुधवारी (दि. २५) रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास आणे गावाजवळ भीषण अपघात झाला. पिकअप (एमएच १६ डीपी ०१०३) आणि बोलेरो (एमएच २० डीव्ही १३०४) या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन नांदूर पठार येथून कलिंगड भरून मुंबईकडे निघाले होते.
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर, जुन्नर तालुक्यातील आणे गावाजवळ आळेफाट्याकडून येणाऱ्या बोलेरो वाहनासोबत त्याची जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण दहा जण प्रवास करत होते.
या अपघातात तुकाराम पोपट मधे (वय ५५, रा. अकलापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
सचिन सकारू पठारे (२३, कोंभळणे)
सुभाष पोपट दुधावडे (१९, अकलापूर)
किरण नारायण खंडागळे (२३, म्हसुंडी)
सुनील भिकाजी केदार (२७, म्हैसगाव)
अशोक दिलीप मढे (१९, चास पिंपळदरी)
संपत गंगाराम पठारे (४२, ओतूर)
सुनील काळे (३५, नारायणगाव)
दत्तू डोके (कोतूळ, ओतूर)
नामदेव मढे (५५, शेरणखेल, ओतूर)
अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य तत्काळ सुरू करण्यात आले. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

More Stories
लोणी काळभोरमधील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल