
विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना अद्यापही चिंताजनक आहेत. शहरातील गजबजलेल्या कोरेगाव पार्क परिसरात ‘डार्क हॉर्स’ पबमध्ये तरुणीसोबत गैरवर्तनाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
घटना नेमकी काय?
माहितीनुसार, पीडित तरुणी कोरेगाव पार्कमधील ‘डार्क हॉर्स’ पबमध्ये गेली होती. रात्रीच्या सुमारास ती पबमधील वॉशरूमबाहेर उभी असताना, तिथे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने तिच्या अंगाला स्पर्श करत जवळ येण्याचा प्रयत्न केला.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तत्काळ आरडाओरडा करत विरोध दर्शवला. तरुणीच्या आरडाओरडीनंतर आरोपी तिथून पळून गेला
याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींचा कोरेगाव पार्क पोलिसांकडून तपास सुरू

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…