
पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरात मंगळवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. नसरापूर प्रकरणानंतर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप केला. संतप्त जमावाने त्या व्यक्तीस पकडून मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

More Stories
नसरापूरमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर खून; आरोपी ताब्यात, संतप्त ग्रामस्थांचा पुणे–सातारा महामार्गावर रास्ता रोको
लाणी काळभोरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी…
पुणे महापालिकेत ‘टक्केवारी’वरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये वाद; व्हिडिओ व्हायरल