
पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना मदत करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या आरोपावरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचारी केतन उत्तम धेंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी ही कारवाई केली असून, या घटनेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात कारवाई करत ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, केतन धेंडे यांनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपींना मदत करण्याची विनंती केल्याचे समोर आले.
याचबरोबर, संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आरोपींना वाचवण्यासाठी दबाव आणण्याचा तसेच प्रलोभन दाखवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…