
पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीचे चार चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
२४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजण्याच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर बसस्टॉपजवळ फिर्यादी दूध आणण्यासाठी पायी जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांचा मोबाईल फोन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानासिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान या गुन्ह्यात राहुल सिताराम निकम (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महंमदवाडी, कोंढवा, पुणे) याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली मिळाली आणि त्याच्याकडून चोरीतील ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. इतर दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानासिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने केली.

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…