July 30, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

‘ओय कलेक्टर, चल खाली ये’ घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले; आंदोलनप्रकरणी सरपंच मंगेश साबळे अटकेत…

संभाजीनगर प्रतिनिधी

संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनादरम्यान घोषणाबाजी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी सरपंच मंगेश साबळे यांना पोलिसांनी अटक केली. आंदोलनादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून “ओय कलेक्टर, चल खाली ये” अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मंगेश साबळे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना एकेरी भाषेत आव्हान देत घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर साबळे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत असून, त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून, तर काहींनी प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त करण्याचा हा मार्ग असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Spread the love