
पुणे (लोणी काळभोर): दिल्लीतील जंतरमंतर येथे २० जुलै २०२६ रोजी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भेट देऊन निवेदन सादर केले. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, २० जुलै रोजी जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची सखोल, निष्पक्ष व कायदेशीर चौकशी करून दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करण्याचे आदेश नेमक्या कोणत्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिले, घटनास्थळी उपस्थित काही पोलिसांच्या गणवेशावर नावाची पाटी का नव्हती, तसेच पोलीस दलाव्यतिरिक्त इतर कोण व्यक्ती तिथे उपस्थित होत्या आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली का, या महत्त्वाच्या मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून, अशा घटनांची पारदर्शक चौकशी होणे न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
२५ जुलै रोजी निषेध आंदोलन व मोर्चा
या घटनेचा निषेध म्हणून शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत लोणी स्टेशन ते दत्त मंदिर चौक (लोणी काळभोर) या मार्गावर निषेध आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या सर्वपक्षीय कार्यकर्ते व निवेदनावेळी ऍड. श्रीकांत होवाळ, बाळासाहेब आवरे, प्रताप ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संचालक व ‘अनफिल्टर्ड ट्रुथ’ वृत्तसंस्थेचे संपादक शंकर जैनजांगडे, रिपब्लिकन भीमक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश जैनजांगडे, अमोल लोंढे, संदीप शेलार, राहुल बनसोडे, ऋषिकेश बागले, सिद्धार्थ गायकवाड, आकाश बागडे, ‘अनफिल्टर्ड ट्रुथ’ या वृत्त संस्थेचे मुख्य संपादक सुनित जैनजांगडे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…