
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील लोणीकाळभोर येथील सरकारी गायरान जागेत खाजगी गट नंबर १६९३ द्वारे बेकायदेशीरपणे कंपाउंड भिंत घालून अतिक्रमण केल्याप्रकरणी हालचाली तीव्र झाल्या आहेत. या प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देणारे नागरिक श्री. राजेंद्र गोविंद साळवे यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत पीएमआरडीएने २७ जुलै २०२६ रोजी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
काय आहे प्रकरण?
लोणीकाळभोर येथील सरकारी गायरान जागेमध्ये खाजगी गट नंबर १६९३ कडून बेकायदेशीर कंपाउंड भिंत उभी करून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण त्वरित काढून टाकण्यात यावे आणि इतर मुख्य मागण्यांसाठी श्री. राजेंद्र गोविंद साळवे यांनी ६ जुलै २०२६ रोजी पीएमआरडीएकडे अधिकृत निवेदन सादर केले होते. तसेच यासंदर्भाil २१ जुलै २०२६ रोजी प्रत्यक्ष चर्चाही पार पडली होती. या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
आयुक्तांचे निर्देश आणि बैठकीची वेळ निश्चित
या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांच्या निर्देशानुसार २२ जुलै २०२६ रोजी पत्र काढण्यात आले. त्यानुसार, २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता महानगर आयुक्तांच्या कार्यालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी श्री. राजेंद्र गोविंद साळवे यांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील (आकुर्डी, पुणे) बैठक दालनात उपस्थित राहण्याचे निर्देश पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या उप आयुक्त (प्र) तथा अधिकार्या आशा होळकर यांनी दिले आहेत. या बैठकीत अतिक्रमणाबाबत काय ठोस निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…