July 30, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

दौंड तालुक्यात शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग; यवत पोलिसांची मोठी कारवाई, दोन आरोपींना अटक…

पुणे, यवत (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): पुणे ग्रामीणमधील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी तात्काळ आणि धडक कारवाई करत दोन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे.

काय आहे नेमकी घटना?

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्ष १० महिने वयाची अल्पवयीन फिर्यादी मुलगी आणि तिची बहीण शाळेतून घरी येत असताना हा प्रकार घडला. २० जुलै २०२६ रोजी सायंकाळी १७.०० वाजता तसेच २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी १७.०० वाजता मौजे पारगाव (ता. दौंड, जि. पुणे) गावाच्या हद्दीत पारगाव चौकात आरोपींनी त्यांच्या ताब्यातील इको गाडी (क्रमांक: MH 42 BS 8535) मधून येऊन मुलींचा पाठलाग केला आणि त्यांची गाडी आडवी लावली.

​आरोपी क्रमांक १ याने गाडीतून खाली उतरून फिर्यादी मुलीचा डावा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच, आरोपी क्रमांक २ याने फिर्यादीच्या बहिणीचा हात धरून तिला अंगावर ओढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलीस कारवाई आणि अटक

​या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७५३/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ६४, ६७(२), ७८(२), ९६(१), ३(१) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि सुवर्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी कारवाई करत खालील दोन आरोपींना २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०७ वाजता अटक केली आहे:

  1. प्रविण गणपत थोरात (रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे)
  2. दिनेश दत्तात्रय पासलकर (रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे)

​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Spread the love