
पिंपरी चिंचवड (सुनित जैनजांगडे): जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना पुणे यांच्या मान्यतेने व सार्थक वेटलिफ्टिंग सेंटर पिंपरी चिंचवड यांच्या सौजन्याने रविवारी (दि. २ ऑगस्ट २०२६) संत तुकाराम नगर, पिंपरी येथे भव्य जिल्हास्तरीय वेटलिवफ्टिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या चुरशीच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १०२ नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत लोणी काळभोर येथील ‘सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटर’ मधील खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी करत अनेक पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे.
पदक विजेत्या खेळाडूंची यादी:
सुवर्णपदक विजेते खेळाडू:
ओवी अमर गिरी
मंजिरी अमित बोळे
आरोही विपुल पवार
तन्वी गणेश अंबिके
रिजा आसिफ शेख
शहनवाज आसिफ शेख
अरमान दगडू शेख
कृष्णा सागर पेटारे
सार्थक ज्ञानदेव इंदलकर
रौप्य पदक विजेते खेळाडू:
कार्तिकी प्रदीप शेडगे
शार्दुल योगेश उबाळे
कांस्य पदक विजेते खेळाडू:
त्रिशा सुधीर काळभोर
श्रद्धा सुनील कसबे
विशेष सहभाग:
मोनिका सागर पेटारे, नंदिनी जालिंदर काळभोर, सिद्धी संतोष गावडे, आराध्या संदीप भोसले, आर्या अण्णाराव गायकवाड, साईराज दीपक भुजबळ आणि हिमांशू कमलेश काळभोर यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
‘बेस्ट वेटलिफ्टर’ किताब पटकावला
या स्पर्धांमध्ये सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळ करत मोठे यश मिळवले. यामध्ये मुलींच्या गटात रिजा आसिफ शेख हिने तर मुलांच्या गटात सार्थक ज्ञानदेव इंदलकर याने चमकदार कामगिरी करत ‘बेस्ट वेटलिफ्टर’ चा मानाचा किताब पटकावला. या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक श्री. गणेश विठ्ठल नगीने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांकडून कौतुक व शुभेच्छा
लोणी काळभोर आणि परिसरातील खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशाबद्दल उपसंचालक (सार्वजनिक बांधकाम विभाग) मंत्रालय श्री. तुषार नामदेव दौंडकर, महाराष्ट्र केसरी श्री. राहुल रामचंद्र काळभोर, सरपंच श्री. नागेश अंकुश काळभोर, अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमंत सोपानराव हाडके, वेटलिफ्टिंग संघटना हवेली तालुका अध्यक्ष श्री. योगेश ज्ञानेश्वर उबाळे, उपाध्यक्ष श्री. अमर गणपत गिरी, खजिनदार श्री. नरेश गणपत गिरी, शिवसेना नेते श्री. रमेश यशवंत भोसले, लोणी काळभोर भाजपा नेते कमलेश दत्तात्रय काळभोर, श्री. आप्पासाहेब काळभोर, आणि श्री. सुधीर काळभोर आदी मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…