September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: जनता वसाहतीत धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगार जेरबंद; गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कारवाई…

पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह तीन विधीसंघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल साडेआठ हजार रुपये किमतीची १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त केली असून, पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​घटनेची पार्श्वभूमी व कारवाईचा घटनाक्रम

​गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक ५ ऑगस्ट २०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना आणि पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व महेश मंडलिक यांना महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. राम मंदिराच्या पाठीमागे, गल्ली नं. ७७, जनता वसाहत, पर्वती येथे गौरव कांबळे हा त्याचे तीन साथीदारांसोबत बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्रे घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली.

​सदर गोपनिय माहितीची खात्री करून युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना ती कळवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ च्या पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई केली.

​जप्त केलेले साहित्य व आरोपींची माहिती

  • मुख्य आरोपी: गौरव राजु कांबळे (वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे)
  • सहकारी: ३ विधीसंघर्षित बाळके (अल्पवयीन साथीदार)
  • जप्त मुद्देमाल: ८,५००/- रुपये किमतीची एकूण १२ धारदार लोखंडी शस्त्रे

​आरोपी गौरव कांबळे आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन पर्वती पोलीस स्टेशनच्या हवाले करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा रजि. क्रमांक २५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

​मार्गदर्शक व कारवाई करणारे पथक

​ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, म.पो.उप-निरीक्षक तेजश्री, उज्वल मोकाशी, संदीप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, योगेश मांढरे व विनायक वगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पुढील तपास पर्वती पोलीस करीत आहेत.

Spread the love

You may have missed