September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन…

लोणी काळभोर (सुनित जैनजांगडे) : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सायबर सेलने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारत सरकारच्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलच्या साहाय्याने हरविलेले १० मोबाईल फोन शोधून काढण्यात आले असून, ते त्यांच्या मूळ मालकांना अत्यंत आनंदाने परत करण्यात आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईल फोनची एकूण बाजारातील किंमत सुमारे ₹३,४०,०००/- इतकी आहे.

​CEIR पोर्टल ठरले वरदान

​CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरविलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन त्यांच्या IMEI क्रमांकाच्या आधारे सहज ट्रॅक करता येतात. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेल्या मोबाईल संदर्भात आलेल्या तक्रारींवर सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर विविध जिल्हे व राज्यांतील पोलीस यंत्रणांशी समन्वय साधत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला, ज्याचा सकारात्मक निकाल मोबाईल शोधण्यात मिळाला.

​यशस्वी कारवाईमागील टीम

​ही धडाडीची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • मार्गदर्शन: श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग), श्री. जीवन बेनिवाल (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६), श्रीमती अनुराधा उदमले (सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग).
  • नेतृत्व: श्री. प्रदीप पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. नंदकुमार कोळी (पोलीस निरीक्षक – गुन्हे), श्री. कृष्णा बाबर (सहाय्यक पोलीस निरीक्षक).
  • प्रत्यक्ष अंमलबजावणी: पोलीस अंमलदार योगेश पाटील, महिला पोलीस अंमलदार उषा थोरात आणि महिला पोलीस अंमलदार कौशल्या शिंदे.

​आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या लोणी काळभोर पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Spread the love

You may have missed