September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणी काळभोर सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन रमेश भोसले यांचा सत्कार; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…

लोणी काळभोर: लोणी काळभोर येथील ‘लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे’च्या चेअरमन पदी नुकतीच रमेश यशवंतराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर आज दिनांक १२/०८/२०२६ रोजी त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि सत्कार समारंभ पार पडला.

​या सत्कार प्रसंगी परिसरातील सामाजिक, राजकीय आणि उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश भोसले यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कारभारात नवीन ऊर्जा येईल आणि सभासदांच्या हिताचे निर्णय वेगाने घेतले जातील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर:

या सत्कार कार्यक्रमास प्रामुख्याने खालील मान्यवर उपस्थित होते:

  • अजय (नाना) काळभोर: व्हाईस चेअरमन, प्रताप ग्रामीण बिगर शेती पतसंस्था.
  • शंकर जैनजागडे: संचालक, प्रताप ग्रामीण बिगर शेती पतसंस्था.
  • सुनित जैनजांगडे: मुख्य संपादक, अनफिल्टर्ड ट्रुथ (Unfiltered Truth).
  • हेमंत कोळपे: युवा नेते, शिवसेना.
  • योगेश शेट वाडेकर: उद्योजक.
  • राहुल बनसोडे: आरपीआय नेते.
  • ​तसेच विशाल शेठ पायाळ, मोहित जैनजांगडे, सुशांत धारुळे उपस्थित होते.

​नवनिर्वाचित चेअरमन रमेश भोसले यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवून शेतकरी आणि सभासदांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Spread the love

You may have missed