
पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळीकांचन दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सभापती युवराज काकडे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, अपघातांची शक्यताही वाढली आहे. परिसरातील नागरिकांनी आणि वाहनचालकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.
”पुणे-सोलापूर हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. मात्र, हडपसर ते उरुळीकांचन दरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रोजच वाहनांचे नुकसान होत आहे आणि वाहनचालकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल,” असा इशारा युवराज काकडे यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…