September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

थेऊरच्या कुंजीर वस्तीत अवैध गावठी दारूविक्री करणाऱ्या ६० वर्षीय महिलेवर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल…

लोणी काळभोर: लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. थेऊर येथील कुंजीर वस्ती परिसरात मानवी आरोग्यास व जीवितास अपायकारक असणारी गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या एका ६० वर्षीय महिला आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​घटनेची थोडक्यात माहिती

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील कुंजीर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी तुळसाबाई दगडू राखपसरे (वय ६० वर्षे, रा. कुंजीर वस्ती, थेऊर, पुणे) ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना मानवी आरोग्यास घातक असणारी गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना रंगेहात निदर्शनास आली.

​५०० रुपयांची दारू जप्त व नोटीस बजावली

​याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार वैशाली कुंडलिक नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपये किमतीची २.५ लिटर मानवी आरोग्यास धोकादायक असलेली गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली आहे.

​सदर कारवाईच्या वेळी सूर्यास्त झालेला असल्याने आणि आरोपी महिला असल्याने, तिला तात्काळ अटक न करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) प्रमाणे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

​दाखल केलेले गुन्हे व कायदेशीर कलम

​याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद १५ ऑगस्ट २०२६ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांकडून केला जात आहे. गुन्ह्याचे दाखल अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

Spread the love

You may have missed