September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: मार्केटयार्ड परिसरात साडेतीन लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्ससह दोन सराईत तस्कर जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाई…

Oplus_131072

पुणे: शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थविरोधी पथक-१ (गुन्हे शाखा) च्या पथकाने मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथे सापळा रचून ४ लाख १३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. १९ ऑगस्ट २०२६ रोजी ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

​अटक करण्यात आलेल्या आरोपींचे तपशील:

  • १) क्रिश राजु परदेशी (वय २१ वर्षे, रा. आनंदनगर, गंगाधाम कोंढवा रोड, मार्केटयार्ड, पुणे)
  • २) अक्षय उस्नप्पा हादीमनी (वय २० वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे)

​दोन्ही आरोपी हे पूर्व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व इतर गुन्हे दाखल आहेत.

​कारवाई कशी झाली?

​अंमली पदार्थविरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक पुणे शहर हद्दीत गस्त घाकत असताना, पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर यांना खबऱ्यामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. पूर्व रेकॉर्डवरील क्रिश परदेशी आणि अक्षय हादीमनी यांनी पैशांसाठी मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून, ते १९ ऑगस्ट २०२६ रोजी गंगाधाम चौक, मार्केटयार्ड येथे विक्रीसाठी येणार असल्याचे समजले.

​या माहितीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित गंगाधाम चौक येथे सापळा रचला. आरोपी काळ्या रंगाच्या डिओ मोपेड गाडीवरून आल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शिताफिने ताब्यात घेतले.

​हस्तगत केलेले साहित्य:

  • मेफेड्रॉन (एम.डी.): १६ ग्रॅम ४६ मिली ग्रॅम (किंमत अंदाजे ₹३,३८,२००/-)
  • वाहन: आर.टी.ओ. नंबर नसलेली काळ्या रंगाची डिओ मोपेड गाडी (किंमत ₹२५,०००/-)
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू: ॲपल कंपनीचा एक मोबाईल हॅण्डसेट (किंमत ₹५०,०००/-)
  • एकूण जप्त ऐवज: ₹४,१३,२००/-

​पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:

​सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त श्री. हसन गौहर, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

​अंमली पदार्थविरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, पोउपनि योगेश कोतकर, स.पो.उनि. आशा भिंगारे, विठ्ठल साळुंखे आणि पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर, अमोल सरडे, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, मंगेश गुंड, संजय राजे, विशाल भिलारे, जान्हवी सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.

Spread the love

You may have missed