
पुणे (प्रतिनिधी : अमित मुंडिक): गेल्या १ वर्षापासून पोलिसांना गुमाव देऊन फरार असलेला आणि तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला मोक्का कायद्याअंतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल असलेला कुख्यात आरोपी प्रदिप दत्तात्रय कंधारे याला कोथरुड पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई मुळशी तालुक्यातील आंदेशे गावात मध्यरात्री करण्यात आली.
कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३(५), १०९, ११८(२), १२६(२), १११(२) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३(१)(ii), ३(४) मधील पाहिजे असलेला आरोपी प्रदिप दत्तात्रय कंधारे (वय – रा. ८४/१६५, मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे) हा मुळशी तालुक्यातील आंदेशे येथे लपून बसल्याची गुप्त बातमी पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे यांना मिळाली होती.
मिळालेल्या बातमीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-३) डॉ. सागर कवडे व सहायक पोलीस आयुक्त (कोथरुड विभाग) सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक खाजगी वाहनाने आंदेशे गावाकडे रवाना झाले.
आंदेशे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात पोलीस पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला. आरोपी प्रदिप कंधारे हा संशयितरीत्या परिसरात आल्याचे दिसताच तपास पथकाने त्याला जागीच घेराव घालून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा-१, पुणे शहर यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली यशस्वी कारवाई:
ही धडक कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त डॉ. सागर कवडे, आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, दत्ता सोनावणे, श्रीकांत दगडे, शकील पठाण, ऋषिकेश कोळप, मयुर पांढरे, गणेश डोंगरे, वैभव शितकाल आणि आकाश वाल्मिकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…