October 28, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

धम्मचक्र प्रवर्तनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त अभिजीत दिपके यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन…

Oplus_16908288

नागपूर (प्रतिनिधी: प्रकाश वाघमारे) : धम्मचक्र प्रवर्तनाला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निमित्ताने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दीक्षाभूमीला भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.

यावेळी अभिजीत दिपके आपल्या सहकाऱ्यांसह दीक्षाभूमीवर दाखल झाले. त्यांनी पवित्र स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरांजली वाहिली.

धम्मचक्र प्रवर्तनाच्या वर्धापनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर सकाळपासूनच अनुयायी आणि नागरिकांची मोठी गर्दी होत असून, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी विविध भागांतून अनुयायी येथे येत आहेत.

Spread the love