
पुणे : राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अग्रिम स्वरूपात ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाना भांगिरे आणि आबा बागुल यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नवरात्रोत्सवाचा खर्च कमी करून दिवाळीनिमित्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत शिवसेनेच्या वतीनेही अशा प्रकारची मदत केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, तर त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

More Stories
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…