
नागपूर (प्रतिनिधी : प्रकाश वाघमारे): महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत शिक्षक, आयटी क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योगपती आणि व्यापारी प्रतिनिधींशी संवाद साधला.
रविवारी झालेल्या या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतानाच त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला समर्थन देण्याचे आवाहन केले.
नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतील मतदारांशी थेट संवाद साधून त्यांचा पाठिंबा मिळविण्यावर पक्षाचा भर असल्याचे या बैठकांमधून दिसून येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या संवाद बैठकांमुळे नागपूर विभागातील निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

More Stories
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…
नागपुरात नगरसेवकाच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सात आरोपींवर मोक्का…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…