October 28, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…

पिरंगुट, पुणे : पिरंगुट येथील महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड आणि रोडरोमिओंच्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात बावधन पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवण्यासह पोलीस मार्शल तैनात करण्याची मागणी करण्यात आली.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांची भेट घेतली. भविष्यात विद्यार्थिनींची छेडछाड आणि त्रास देण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणातील सहा आरोपींना अवघ्या २४ तासांत पकडून त्यांच्यावर कारवाई केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना कटिबद्ध

मुलींना निर्भय वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यार्थिनींची सुरक्षा ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे युवा सेनेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना नेहमी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे, अनिकेत पवार, अक्षय अमराळे, शरद यादव, सुरज खांडेकर, उमेश बुक्कनकर, सुरज गावडे, अशोक जोगदंड तसेच अन्य युवा सैनिक उपस्थित होते.

Spread the love