March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

Siddhi Vastre Mohol Nagarparishad Election Results 2025: 7 हजार पगाराची नोकरी ते नगराध्यक्षपद; 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रेंनी रचला इतिहास

मोहोळ नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपाच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले आहे. त्यांच्या या विजयामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.

मोहोळ (सोलापूर):

मोहोळ नगरपरिषदेच्या राजकारणात ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपद जिंकत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या सिद्धीने अल्पावधीतच प्रभावी प्रचार करत थेट नगरपरिषदेच्या प्रथम नागरिकपदावर आपलं नाव कोरलं.

सीए कार्यालयात केवळ 7 हजार रुपयांच्या पगारावर काम करणारी सिद्धी वस्त्रे यांनी अवघ्या एका महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कमी वेळ असूनही त्यांनी शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधला, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली आणि तरुणाईशी भावनिक नातं जोडत प्रभावी प्रचार केला.

या निवडणुकीत सिद्धी वस्त्रे यांनी मोहोळ शहरात मोठी राजकीय ताकद असलेल्या भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव केला. या विजयामुळे मोहोळच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. सध्या त्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून ओळखल्या जात आहेत.

🔹 सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक निकालांची ठळक

वैशिष्ट्ये(Nagarparishad Election Results 2025)सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. भाजपने पहिल्यांदाच सर्व 12 ठिकाणी स्वबळावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते. मात्र अपेक्षित यश न मिळता भाजपला केवळ 4 ठिकाणी सत्ता मिळवता आली.

मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांनी 6 ठिकाणी निवडणूक लढवत 3 ठिकाणी विजय मिळवला, तर काँग्रेसला एकाही नगराध्यक्षपदावर यश मिळालं नाही.

🔹 तालुकानिहाय ठळक निकाल

▪ अक्कलकोट तालुका

अक्कलकोट नगरपरिषदेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एकहाती सत्ता मिळवली. मैंदर्गी नगरपरिषदेत भाजपच्या अंजली बाजारमठ नगराध्यक्ष ठरल्या. 135 वर्षांनंतर प्रथमच येथे राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष निवडून आला.

▪ बार्शी

विधानसभा पराभवानंतर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार पुनरागमन करत बार्शी नगरपरिषदेत भाजपचा झेंडा फडकावला. भाजपच्या तेजस्विनी कथले नगराध्यक्ष ठरल्या.

▪ मोहोळ

मोहोळ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. भाजपविरोधी लढाईत राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला.

▪ अकलूज

अकलूज मध्ये स्थानिक जनतेने पुन्हा एकदा मोहिते पाटील–शरद पवार गटाला कौल दिला. मात्र भाजपसाठी चार नगरसेवक निवडून येणं महत्त्वाचं यश ठरलं.

▪ पंढरपूर–

मंगळवेढादिवंगत आमदार भारत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकले, मात्र बहुमत भाजपकडे आहे.

▪ करमाळा व कुर्डूवाडी

करमाळ्यात स्थानिक आघाडीने बाजी मारली, तर कुर्डूवाडीत शिवसेना ठाकरे गटाने सत्ता कायम ठेवली.

🔹 एकूण राजकीय चित्र

सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी

4 नगरपालिकांवर भाजप 3 शिवसेना (शिंदे गट) 3 स्थानिक आघाडी 1 शिवसेना ठाकरे गट 1 राष्ट्रवादी शरद पवार गटविजयी ठरला आहे. या निकालांमुळे आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांसाठी जिल्ह्यातील राजकारण अधिक चुरशीचं होण्याचे संकेत मिळत आहेत.

Spread the love