
लोणी काळभोर (पुणे): दिल्लीतील जंतरमंतर येथे २० जुलै २०२६ रोजी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज, २५ जुलै २०२६ रोजी लोणी काळभोर येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सकाळी १०:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत लोणी स्टेशन ते दत्त मंदिर चौक (लोणी काळभोर) या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनादरम्यान लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच, या लाठीहल्ल्याची सखोल, निष्पक्ष व कायदेशीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, बळाचा वापर करण्याचे आदेश देणाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा लावून धरण्यात आली.
मोर्चात सहभाग:
आजच्या या निषेध मोर्चा व आंदोलनात लोणी काळभोर परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सहभागी: महेंद्र जैनजांगडे, सूर्यकांत आप्पा गवळी, बाळासाहेब आवारे, दिगंबर जोगदंड, विजय गायकवाड, संजय गायकवाड, दत्तात्रेय कांबळे, योगेशनाना काळभोर, रमेशदादा भोसले, श्रीकांतदादा ओव्हाळ, अमोल लोंढे, दीपक आढागळे, संजय लोंढे, संदीप शेलार, सुजीतभाऊ कांबळे, शंकर जैनजांगडे, हनीपभाई शेख, रमेश गायकवाड, संदीप निकाळजे, संतोष आढाळे, दत्तात्रय काळभोर, अमोल महानवर, रवी गायकवाड, संतोष रायकर, बाळासाहेब केदारी, बापू शिंदे, महेश गायकवाड, दीपक फुलचंद चतुर, बाळकृष्ण काकडे, प्रकाश काळभोर, अमर गायकवाड, ऋषी बागले, सिद्धार्थ गायकवाड आणि संतोष गायकवाड.
सहभागी महिला: अनिताताई गोरे, अनिताताई गवळी, कौशल्या इगनाजे, अंजनाताई देडे, सारिका साळवे, स्नेहलताई गोरे, आणि मंगलताई सूर्यवंशी आदी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनात सहभाग घेतला.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…