
पुणे, २० जुलै २०२६: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध व्यवसाय, अमली पदार्थ विक्री आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत कारवाईचा तीव्र बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त (झोन-७) अभिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने चंदननगर, वाघोली आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाया करत जुगार अड्डे आणि ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
१) चंदननगर: हायप्रोफाईल मटका अड्ड्यावर रेड, १२.३१ लाखांचा माल जप्त
विशेष पथकाने वडगाव शेरीतील साईनाथ नगर परिसरात चालणाऱ्या ‘कल्याण मटका’ आणि ‘मिलन राजधानी पूना बाजार’ या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मटका चालवणाऱ्या ७ रायटर्ससह २ ग्राहकांना रंगेहात ताब्यात घेतले.
- ताब्यात घेतलेले आरोपी: भीम रमेश तेलंगी (वय ३१), अर्जुन भीमराव शिंदे (वय ५०), नवनाथ गोरख म्हस्के (वय ५५), लक्ष्मण एकनाथ आढागळे (वय ४७), निलेश राजेश गुंजाळ (वय ३६), राजेंद्र संभाजी मोरे (वय ५४), अतिश सतीश सोनवणे (वय २९), नवनाथ सुभाष गायकवाड (वय ३१) आणि विठ्ठल छबुराव दुवे (वय ५०).
- जप्त मुद्देमाल: रोख रक्कम, ३ दुचाकी, ६ मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण १२,३१,७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- चालक व जागामालकावर गुन्हा: या अड्ड्याचा मुख्य चालक विशाल जगदीश तिवारी (रा. खराडकर पार्क) आणि घरमालक सोनू पिल्ले (रा. वडगाव शेरी) यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२) वाघोली: स्पोर्ट्स बाईकवरून ‘MD’ ड्रग्जची तस्करी; दोघे गजाआड
वाघोली परिसरात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पोर्ट्स बाईकवरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडून १५.८० ग्रॅम एमडी (Mephedrone) हा घातक अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
- अटक आरोपी: तुषार बाळासाहेब म्हस्के (वय २६) व राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय २७).
- कारवाई: आरोपींविरुद्ध NDPS Act कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या अमली पदार्थांची पुरवठा साखळी (Forward & Backward Linkages) शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
३) विमानतळ परिसर: जुगार अड्ड्यावर कारवाई
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकाने महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १२ (अ) अंतर्गत धाड टाकून मटका चालकांवर कारवाई केली. या ठिकाणाहून रोख रक्कमेसह ११,७७० रुपयांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक
ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ कराड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकातील हवालदार बेंद्रे, साबळे, इथापे तसेच पोलीस शिपाई पुंडे, चित्रे व सरतापे यांनी केली. विशेष पथकाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त अभिनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
नागरिकांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन
पुणे शहर (झोन-७) पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात गुन्हेगारी टोळ्या, अमली पदार्थ, बेकायदेशीर गुटखा विक्री, अवैध दारू, जुगार किंवा शस्त्रास्त्रांविषयी माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
- श्री. अभिनाश कुमार (IPS) (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७) : 88020 07938
- सहा. पो. नि. गोरक्षनाथ कराड (विशेष पथक) : 99227 17999
- पो. उप. नि. नितीन राठोड : 99227 44599

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…