
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर वाढल्याचे समोर आले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास नांदे पाटील वस्ती आणि सकट वस्ती परिसरातील एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन संशयित चोरटे कैद झाले आहेत. काही स्थानिक नागरिकांनीही त्यांना पाहिले असून आरडाओरड केल्यानंतर संबंधित चोरटे तेथून पळून गेले.
परिसरात वारंवार संशयास्पद हालचाली दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/reel/DVNsGa0CN2A/?igsh=MWd1amp5Z2R6YWJpYg==

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…