महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी. संपूर्ण वेळापत्रक व नियम जाणून घ्या.

पुणे :
राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक कार्यक्रमातील बदलाचे मुख्य कारण
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते चिन्हांच्या वाटपापर्यंतची सर्व प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्य शासनाने त्यांच्या सन्मानार्थ 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सरकारी कामकाज आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याने आयोगाने मतदानाचे टप्पे पुढे ढकले आहे.
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. यापूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार होते. मात्र आता ही प्रक्रिया 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
मतदानाच्या तारखेत बदल झाल्याने मतमोजणीच्या वेळापत्रकातही सुधारणा करण्यात आली आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, या निवडणुकांचा मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे.
मतदानाची नवी वेळ
सुधारित कार्यक्रमानुसार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपुष्टात येणार आहे.
मतमोजणी कधी?
मतमोजणीची प्रक्रिया 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. मतमोजणी पूर्ण होताच निकाल जाहीर केला जाईल आणि संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता तात्काळ समाप्त होणार आहे.
दरम्यान, निवडून आलेल्या सदस्यांची अंतिम नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…