
पुणे, दि. २५ जून : फरासखाना पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत एका सराईत चोराला अटक केली असून त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रामेश्वर दशरथ बोडखे (वय ३२, रा. बुधवार पेठ, पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला गुन्हा क्रमांक १८९/२०२६ अंतर्गत अटक करून त्याने निर्जनस्थळी लपवून ठेवलेल्या अंदाजे ९० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…