March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

अजितदादांसाठी पुणे बंद! आज आणि उद्या बंद; मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय…

Pune shut down due to Ajit Pawar death: महानगर पालिका आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आज आणि उद्या पुणे बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar Plane Crash:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. आज बारामतीत राजकीय सभेसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या घटनेनंतर राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस पुणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महानगर पालिका आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आज आणि उद्या पुणे बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच मार्केट यार्ड देखील बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय आज बारामती देखील बंद ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी सर्व आस्थापना बंद ठेवल्या आहेत. तसेच लोकांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली आहे.

आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.



Spread the love