
पुणे शहर पोलिस दलात महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल 32 कर्मचाऱ्यांची एकाच आदेशाने बदली करण्यात आली आहे. हे आदेश अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी बुधवारी (दि. 18) रात्री उशिरा परिपत्रकाद्वारे जारी केले.
एकाच ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्याने पोलिस दलात चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते हा नियमित प्रशासकीय फेरबदल असला, तरी अचानक झालेल्या हालचालीमुळे काही तर्क-वितर्काना लावण्यात येत आहेत.
दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की पुणे पोलीस आयुक्त आम्ही देश कुमार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रार अर्ज ही प्राप्त झाले आहेत असं बोललं जातंय
आदेशातील प्रमुख मुद्दे
हा निर्णय महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (एन) अन्वये घेण्यात आला आहे. आदेशानुसार:
* 3 सहाय्यक फौजदार
* 10 पोलीस हवालदार
* 19 पोलीस अंमलदार
यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तसेच पोलीस अंमलदार इंद्रजीत जालिंदर डाडर यांची वैद्यकीय व कौटुंबिक कारणास्तव विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून नव्या ठिकाणी रुजू झाल्याचा अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कुठे झाली बदली?
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने खालील पोलीस ठाण्यांकडे नियुक्त करण्यात आले आहे:
* लोहगाव
* विमानतळ
* चंदननगर
* सिंहगड रोड
विशेषतः लोहगाव आणि विमानतळ पोलीस ठाण्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हलविण्यात आले आहे.
सहाय्यक फौजदार
* संतोष सुखदेव घावटे (लोहगाव)
* विनोद ज्ञानेश्वर कांबळे (विमानतळ)
* रामदास शंकर मेमाणे (चंदननगर)
पोलीस हवालदार
* विजय नथु जाधव (लोहगाव)
* अश्विनी जयसिंग माळी / अश्विनी दत्ता डबाणे (लोहगाव)
* दिपाली दौलत पाडुळे (लोहगाव)
* गणेश विलास सातपुते (लोहगाव)
* दादा भिमराव हजारे (विमानतळ)
* सुनिल मदन नागलोत (विमानतळ)
* तेज दीपक भोसले (विमानतळ)
* प्रदिप भिमराव क्षिरसागर (चंदननगर)
* संभाजी सुभाष दिवेकर (चंदननगर)
* दिगंबर रामदास जगताप (चंदननगर)
पोलीस अंमलदार
* अजिंक्य दिपक जोजारे (लोहगाव)
* शैलेश चांगदेव कुदळे (लोहगाव)
* वैशाली महीपती निकबे (लोहगाव)
* बाजीराव चंदर वीर (लोहगाव)
* अमोल विष्णु मुंडे (लोहगाव)
* चक्रधर जयद्रथ शिरगिरे (लोहगाव)
* राहुल सुरेंद्र माळगे (लोहगाव)
* ईश्वर हरीदास भगत (लोहगाव)
* प्रशांत प्रकाश सुतार (विमानतळ)
* अक्षय राजेंद्र कटके (विमानतळ)
* बालाजी संदीपान बांगर (विमानतळ)
* संदिप किशन धुमाळ (विमानतळ)
* प्रविन नामदेव सपकाळ (विमानतळ)
* मल्हारी शिवाजी ढमढेरे (विमानतळ)
* दिपक सुनिल सोनवणे (विमानतळ)
* कोमल सोमेश्वर आखाडे (विमानतळ)
* किशोर पांडुरंग कुलकर्णी (सिंहगड रोड)
* वसंत भानुदास चव्हाण (सिंहगड रोड)
* घनश्याम कुमार आडके (सिंहगड रोड)
पुढील परिणामांकडे लक्ष
या मोठ्या फेरबदलामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कामकाजावर काय परिणाम होणार, तसेच नव्या मनुष्यबळासह संबंधित ठाण्यांची कार्यपद्धती कशी राहील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रशासकीय कारणास्तव झालेला हा बदल असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात येत असले, तरी पोलिस दलात या निर्णयाबाबत चर्चा सुरूच आहे.

More Stories
आजचे राशीभविष्य | शुक्रवार, 30 जानेवारी 2026 | आज नशीब कोणाच्या बाजूने?
आजचे राशीभविष्य | मंगळवार, २७ जानेवारी २०२६ | आज नशीब कोणाच्या बाजूने?
आजचे राशीभविष्य | शनिवार, २४ जानेवारी २०२६ | आज नशीब कोणाच्या बाजूने?