
पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चोरीच्या ६ मोटारसायकली आणि ४ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाला वाघोलीतील बायफ रोड परिसरात मोटारसायकल चोरी करणारे दोन संशयित उभे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अर्सलान मुस्ताक तांबोळी (वय १८) आणि सिद्धांत दिलीप वाघमारे (वय १८) अशी असून, पुढील तपासात त्यांचा साथीदार अरमान रियाज तांबोळी (वय १८) तसेच एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
पोलिस तपासात लोहगाव, लोणी काळभोर, शिक्रापूर, विश्रांतवाडी आणि भोसरी पोलीस ठाण्यांतील एकूण ६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालात ६ मोटारसायकलींसह ४ मोबाईल फोनचाही समावेश आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार युनिट ७ च्या पथकाने केली.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…