September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुणे: खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट २ कडून अटक; कोंढव्यातून ठोकल्या बेड्या!

पुणे:पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नासारख्या (Attempt to Murder) गंभीर गुन्ह्यातील फरार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. रोहन उर्फ राहुल महेश हिंगणेश्वर (वय २२ वर्षे, रा. बोपोडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे येवलेवाडीत सापळा

​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख आणि शंकर नेवसे हे युनिट २ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान पोलीस पथकाला सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली.

​या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंढवा परिसरातील पानसरे नगर, येवलेवाडी येथे तातडीने सापळा रचला आणि आरोपी रोहन उर्फ राहुल हिंगणेश्वर याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला खडकी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी

​अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्रमांक १४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, १९०, १९१, १९१/३, ११८/२, १२५, ३५१/२, ३५२ सह आर्म ॲक्ट ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी

​सदरची धडक कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्यासह पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख, शंकर नेवसे, शिवानंद कायगुडे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, योगेश मांढरे, संदीप शिर्के, आजीम शेख, विशाल दळवी, सद्दाम तांबोळी आणि ऋषिकेश व्यवहारे या गुन्हे शाखा युनिट २ च्या संपूर्ण पथकाने मोलाची भूमिका बजावली.

Spread the love

You may have missed